” सकल जन हिताय “

संस्थेच्या या ब्रीदवाक्यानुसार संस्थेच्या जवळ जवळ १६ विभागामध्ये बहुजन समाजातील हजारो विद्यार्थी अत्यल्प फी मध्ये शिक्षण घेत आहेत. सर्वांना शिक्षण मिळावे म्हणजे शिक्षणाच्या हक्कापासून कोणीही वंचित राहू नये म्हणून ११वी नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी १२वी वाणिज्य व विज्ञान विभागाचे खाजगी वर्ग (१७ नंबर) अॅड श्री पी. सी. पाटील साहेब यांच्या संकल्पनेतुन सुरु करुन सदर विद्यार्थ्यांप्रमाणे मार्गदर्शन करुन त्यांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणले जाते. संस्थेच्या सर्व विभागातील विद्याथ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी तसेच विद्याथ्र्यांच्या सुर्वांगीण विकासाला वाव मिळावा यासाठी संस्थेने आपल्या संकुलनात विविध शैक्षणिक सुविधांची व्यवस्था केली आहे. विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी तसेच क्रीडा स्पर्धासाठी भुव्य मैदान संस्थेने उपलब्ध करुन दिले आहे. फुटबॉल, हँडबॉल क्रिकेटसाठी संस्थेच्या माध्यमातून सर्व सोयींनी सुसज्ज असे एक नवीन मैदान D.v.s. Game on Turf या नावाने सुरु केले आहे. याशिवाय विज्ञान अर्थ, समाजसेवा, धार्मिक, प्रबोधुनुपर, बालसाहित्य तसेच १०वी व १२वी साठी विशेष मार्गदर्शनपुर अशी जवळ जवळ १२००० पुस्तके उपुलुब्ध असणारे असे सुसज्ज वाचनालय व ई लायब्ररी सुर्व विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे. तसेच विज्ञान विभागासाठी सुसज्ज प्रयोगशाळा व पालकसभा तसेच विविध प्रबोधनपुर कार्यक्रमासाठी भुव्य असे गुणेशजी नाईक सभागृह संस्थेने उपलब्ध करुन दिले आहे.

संस्थेचे सरचिटणीस मा. श्री मोरेश्वर पाटील साहेब नेहमी म्हणतात की,

” इवलेसे रोप लावियेले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी”

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या या उक्तीचा प्रत्यय आज आपल्या संस्थेच्या बाबतीत येताना दिसत आहे. संस्थेच्या सर्व शैक्षणिक विभागामध्ये जवळ – जवळ पाच हजार पाचशे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तसेच दरवर्षी बहुजन समाजातील हजारो विद्यार्थी शिक्षण घेवून आज डॉक्टर, वकील, इंजिनिअर, बांधकाम व्यावसायिक, प्रशासन तसेच खाजगी क्षेत्रात मोठ्या हुद्दयावर कार्यरत आहेत. आज संस्थेने यशस्वीतेची ३० वर्षे पूर्ण केली आहेत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आपल्या संस्थेत ज्ञानदानाचे पवित्र कार्य करण्यासाठी यापुढेही आम्हास संस्थेचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद लाभावा हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो व सर्व ज्ञान विकास परिवारास संस्थेच्या त्रिदशकपूर्तीनिमित्त शुभेच्छा देतो. धन्यवाद !