प्रवेश घेण्याचे व नाव कमी करण्यासंबंधीचे नियम

१. विद्यार्थांचे वय १ जून पूर्वी पहिलीसाठी ५.५ वर्ष पूर्ण असावे. ५.५ वर्षाखालील विद्यार्थास प्रवेश देण्यात येणार नाही.
२. इतर वर्गासाठी परीक्षा घेऊन योग्य वाटल्यास त्याला प्रवेश देण्यात येईल.
३. शाळा सोडल्याचा दाखला हवा असल्यास पालकांस त्यासाठी अर्ज करावा लागेल. त्यापूर्वी फी भरल्यानंतर व अर्ज मिळाल्यानंतर आठ दिवसांनी दाखल देण्यात येईल.
४. कोणत्याही सत्रामध्ये शाळा सोडल्यास अथवा प्रवेश घेतल्यास विद्यार्थास संपूर्ण टर्मची फी भरावी लागेल.
५. शाळा सोडल्याची कोणतीही सूचना सत्र संपण्यापूर्वी न दिल्यास त्यास दुसऱ्या टर्मची फी भरावी लागेल.
६. पूर्वी शाळेत न गेलेल्या विद्यार्थास प्रवेशाच्या वेळी जन्मतारखेचा दाखला द्यावा लागेल.