सौ. सुमित्रा हरिश्चंद्र पाटील डी. एड. एम. ए. बी. एड. मुख्याध्यापिका प्राथमिक विभाग ज्ञानविकास संस्था

मी सुमित्रा पाटील मुख्याध्यापिका, ज्ञानविकास प्राथमिक विद्यालय कोपर खैरणे, येथे कार्यरत आहे. विद्यालयात एकूण २५ वर्ग आहेत, त्यावर ३० शिक्षक अध्यापन करतात. विद्यालयात एकूण १६०१ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

सर्व शिक्षक शैक्षणिक अहर्ता प्राप्त व अनुभवी असून विद्यालयाचा विकास व दर्जा वाढवण्याच्या हेतूने झटत आहेत.

स्कॉलरशिप, एलिमेंटरी , होमीभाभा, रामायण, सकाळ चित्रकला, अशा विविध स्पर्धांमध्ये विध्यार्थी अधिक वेळ थांबवून मार्गदर्शन हे विनामूल्य केले जाते.

विद्यालयात E-Education, Computer, AV Room, तसेच Big Art कला दालन विध्यार्थ्यांसाठी आहे. विध्यार्थांचा शारीरिक विकास मैदानावर होतो, त्यासाठी प्रशस्त मैदान आहे. यासर्वांचे श्रेय शिक्षकांप्रमाणे आमच्या संस्थेला पण जाते . संस्थेचे अध्यक्ष मा. आदरणीय पी. सी. पाटील आणि उपाध्यक्ष मा. गजानन पाटील, सेक्रेटरी मा. मोरेश्वर पाटील, खजिनदार मा. महादेव पाटील, सहसचिव मा. राम पाटील , सर्वसंचालक जयश्री पाटील या सर्वांची मेहनत आहे. सर्व सहकार्य विद्यालयास मिळते.

या सर्वांनां हार्दिक शुभेच्छा!!