नियम

१) प्रत्येक विद्यार्थ्याने शाळेची नोंदवही दररोज आणावी. ती न आणल्यास तो शिक्षेस पात्र राहील. तसेच पालकांनी दररोज दैनंदिनी पाहून शिक्षकांनी दिलेल्या सूचना पहाव्यात.

२) शाळेची पहिली घंटा सुरु होण्यापूर्वी १० मिनीटे आधी विद्यार्थी वर्गात

असणे आवश्यक आहे.

३) जो विद्यार्थी दररोज उशिरा येत असेल, त्याचा गणवेश नसेल व शाळेच्या नियमाबाहेर वर्तणूक असल्यास त्याचे शाळेतून नांव कमी करण्यात येईल.

४) कोणत्याही विद्यार्थ्यास शाळेच्या वेळेत घरी जाण्यास परवानगी देण्यात येणार नाही. फक्त आजारी असल्यास परवानगी देण्यात येईल.

५) शाळेची पुस्तके व इतर वस्तूची जबाबदारी प्रत्येक विद्यार्थ्यांची राहील. विद्यार्थ्यास सोन्याची अथवा मौल्यवान वस्तू घालून शाळेत येण्यास सक्त मनाई आहे व तरीही घालून आल्यास व ती हरवल्यास त्यास शाळा जबाबदार राहणार नाही.

६) शाळेतील सामानाची कोणत्याही प्रकारची नुकसानी केल्यास विद्यार्थ्याने ती नुकसानी भरुन देणे आवश्यक आहे.

७) शाळेच्या मालमत्तेची विद्यार्थ्याने योग्य प्रकारे काळजी घेणे आवश्यक आहे. उदा. फर्निचर, शालेय साहित्य, लाईट, स्विच, पंखा.

८) शाळेचे आवार स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी सर्वांची आहे. कागदाचे कपटे,

फळांच्या साली अथवा अन्य निरुपयोगी वस्तू मैदानावर, वहांड्यात अथवा वर्गात टाकू नये. त्याकरीता वर्गातील कचरापेटीचा उपयोग करावा.

९) शाळेत व शाळेच्या बाहेर विद्यार्थ्यांची वर्तणूक शिस्तीची असणे आवश्यक आहे.

१०) सत्रात प्रत्येक विद्यार्थ्याने ७५ टक्के दिवसउपस्थित राहीले पाहिजे. यापेक्षा कमी हजेरी भरत असल्याचा अर्ज शाळेच्या मुख्याध्यापकांकडे सादर करून विद्यार्थी गैरहजर ज्या ज्या दिवशी असेल त्या त्या दिवसाची कारणे व त्या बद्दलची योग्य प्रमाणपत्रे सादर करावीत.

११) मुख्याध्यापकांच्या परवानगीशिवाय कोणत्याही विद्यार्थ्यास कोणत्याही प्रकारचा निधी गोळा करतायेणार नाही..

१२) कोणत्याही स्वरुपाची भेटशिक्षकांसदेणे निषिद्धसमजले जाईल.

१३) पालकांनी रोजच्यारोज दैनंदिनी पहावी व त्याप्रमाणे मुलांना मार्गदर्शन करावे.

१४) पालकांनी प्रत्येक आठवड्याच्या शनिवारी शाळा सुटल्यानंतर शिक्षकांना भेटावे इतर कोणत्याही दिवशी भेटता येणार नाही.

१५) सर्व प्रकारचे अर्ज मुख्याध्यापकांच्या नावे करावेत. त्यात विद्याथ्र्याचे नांव, इयत्तातुकडीयाचा समावेश असावा.

१६) विद्यार्थ्यास रजा आवश्यक असल्यास त्यापूर्वी अर्ज देणे आवश्यक आहे.

१७) रजेचा कालावधी दैनंदिनीत दिलेल्या रकान्यात लिहावा.

१८) पालकांनी शालेय सभा व शालेय कार्यक्रमात सहभागी व्हावे.

 

कार्यक्रमात उपस्थित न राहणा-या पालकांनी गैरहजेरी लक्षात घेतली जाईल.

वरील सर्व नियममी वाचले असून ते नियममला बंधनकारक असतील.