ह.भ.प. श्री. मोरेश्वर चिंतामण पाटील सरचिटणीस, ज्ञान विकास संस्था, कोपरखैरणे मा.सरपंच ग्रुप ग्रामपंचायत, कोपरखैरणे अध्यक्ष, शेतकरी समाज संघटन अध्यक्ष, सर्व नागरीक वारकरी मंडळ आखिल आगरी भुषण पुरस्कार प्राप्त

” इवलेसे रोप लावियले दारी”

कोपरखैरणे गावामध्ये फक्त इयत्ता 7वी पर्यंत शिक्षणाची व्यवस्था होती. त्यामुळे मुलांना उन्हा-पावसातून, इ.8वी, इ.9वी व 10वी करीता इतर ठिकाणी जावे लागत होत. याची अॅड. पी.सी. पाटील व मला खंत होती म्हणून आम्ही गावांतील काही शिक्षणप्रेमी लोकांना एकत्र करून विचार केला की, आपल्या कोपरखैरणे गावामध्ये माध्यमिक शिक्षणाची व्यवस्था करायला पाहीजे असे ठरवून अॅड. पी. सी. पाटील यांना अध्यक्ष नेमून सन 1987 साली ज्ञान विकास संस्थेची स्थापना केली. प्रथम कोपरखैरणे येथील सर्वे नंबर 228 मध्ये लोकवर्गणी करून तीन रूमचे बांधकाम करून दिनांक 6 नोव्हेंबर 1987 साली शिक्षण खात्याकडून परवानगी घेवून इ.8वी ते 10वीचे वर्ग सुरू केले नवीमुंबई मध्ये अनेक प्रकारच्या समाजाचे लोक रहायला आले आणि पुढेही येतील आणि काही प्रमाणात शिक्षण संस्था स्थापन करून श्रीमंताच्या मुलांना हवी ती फी घेवून शिक्षण देतील याचा विचार करून स्थानिक प्रकल्पग्रस्त आगरी, कोळी व बहुजन समाजाच्या मुलांना इतर समाजाच्या मुलांप्रमाणे शिक्षण मिळावे हेच ध्येय व उद्देश ठेवून आम्ही ही ज्ञान विकास संस्थेची स्थापना केलेली आहे. सदर ठिकाणी बांधलेले रूम वाशी-घणसोली रोड मध्ये येत असल्याने सिडकोने संस्थेला नोटीस पाठवून सदरचे रूम तोडावे असे सांगितले पंचायतीच्या माध्यमातून त्यांना उत्तर पाठवून सांगितले की, आम्हाला पर्यायी जागा द्या म्हणजे आम्ही सदरचे रूम तोडू त्याप्रमाणे सिडकोने कोपरखैरणे सेक्टर 17 मध्ये 1500चौ. मीटर जागा प्राथमिक करीता व 3000 चौ.मीटर जागा माध्यमिक करिता अशी 4500 चौ. मीटर शिक्षणसाठी व 7500 चौ. मीटर जागा भुईभाडे घेवून मैदानाकरीता दिलेली आहे. सदर ठिकाणी विभागातील व गावांतील दानशुर व्यक्तींकडून देणग्या जमा करून या भव्य इमारतीचे आर.सी.सी. चे काम करून काही रूमचे बांधकाम केले. 1987 साली माध्यमिकचे आठवी ते दहावी असे वर्ग सुरू केले.

सन 1992साली प्राथमिकची शिक्षण खात्याकडून परवानगी घेवून इ.1ली ते 7वीचे वर्ग सुरू केले तर सन 1997 साली ज्युनियर कॉलेज सुरू केले तसेच सन 2005 मध्ये एम.एस.सी. आय.टी.चे व बी.एस.सी.आय.टी.चे वर्ग सुरू केले त्याचप्रमाणे सन 2005 साली इंग्रजी माध्यमाचे इयत्ता 1वी ते 7वी वर्ग सुरू केले व यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे वर्ग सुरू केले असून सन 2011 साली मुंबई विद्यापीठाच्या माध्यमातून सिनियर कॉलेजचे इ. 13 वी ते 15वीचे वर्ग सुरू केले असून या ज्ञान विकास संकुलनात 7000 विद्यार्थी आजमितीस शिक्षण घेत आहेत तसेच स्वयंरोजगार करण्यासारखे अभ्यासक्रम संस्थेने चालू केलेले आहेत. शाळेचा निकाल दरवर्शी 95 ते 99 टक्के लागत आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटत आहे. त्याचप्रमाणे सर्व पदाधिकारी, सर्व संचालक मंडळ, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी | एक दिलाने हे शिक्षण संकुलन चालविण्याकरीता आम्हा पदाधिका-यांवर विश्वास ठेवत असल्याने या ज्ञान विकास संस्थेला आदर्श शिक्षण संस्था म्हणून सिडकोकडून गौरविण्यात आले आहे. आज या ज्ञान विकास संस्थेला तीस वर्षे पूर्ण झालेली असुन या तिसाव्या वर्धापनाच्या हार्दिक शुभेच्छा !

 

आपला

 

ह.भ.प. श्री. मोरेश्वर चिंतामण पाटील

सरचिटणीस, ज्ञान विकास संस्था

कोपरखैरणे , नवीमुंबई